महाराष्ट्र दिनापासून  "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" चे शुभारंभ 

आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना
 

धाराशिव - महाराष्ट्र दिना पासुन उस्मानाबाद जिल्हयात "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजनेची शुभारंभ होणार आहे जिल्हायातील नगर परिषद व नगर पालिका मध्ये हे दवाखाने कार्यान्वित होणार आहे. या दवाखान्या मध्ये सर्व उपचार मोफत मिळणार असुन मोफत तपासणी व गर्भवती माता संदर्भातही सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतुन ही योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे.

       राज्याच्या आरोग्य विभागाकडुन " हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेची सुरुवात होणार आहे. दिनांक 01 मे 2023 या तारखेपासुन जिल्हयात या योजनेच्या माध्यमातुन तयार केलेले दवाखाने कार्यान्वित होणार आहेत जिल्हयातील 8 नगर पंचायती व नगर पालिका मध्ये या योजने अंतर्गत दवाखान्यातील निर्मीती करण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 15 व्या वित्त आयोगाच्या निधी मधुन या दवाखान्यांची निर्मिती केलेली आहे या दवाखान्या मध्ये सर्व उपचार व तपासण्या मोफत केल्या जाणार असुन औषधेही मोफत पुरवली जाणार आहेत. गरोदर मातांची नियमित तपासणी व त्याच बरोबर लसीकरण आदी आरोग्य सेवाही पुरवली जाणार आहे.

       15 वा वित्त आयोग अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील शहरी भागामध्ये 18 शहरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुर झाली आहेत. यामध्ये उस्मानाबाद शहारात 4, तुळजापुर शहरात 2, नळदुर्ग-1 वाशी-2, लोहारा - 2, उमरगा-3, मुरुम - 1, कळंब- 1, परांडा - 1, भुम- 1, असे एकुण 18 आरोग्य उपकेंद्र मंजुर झाले आहेत. सदर दवाखाना केंद्रापैकी प्रत्येक तालुक्यातुन एक असे 8 दवाखाने "हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" म्हणुन निवडण्यात आले आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये एक वैद्यकिय अधिकारी ( एम. बी. बी. एस. ), एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय कर्मचारी असे एकुण 54 पदे भरण्यात आली आहेत. तसेच बाहय संस्थेमार्फत शिपाई व सुरक्षा रक्षक असे एकणु 36 पदे भरण्यात आली आहेत.

      त्याच बरोबर महिन्यातुन एकदा नेत्र शिबीर, बाहय यंत्राव्दारे रक्त तपासणी व मानसिक समुपदेशनही या दवाखान्या मध्ये करण्यात येणार आहे. सदर आरोग्य केंद्रामधुन देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे अवाहन  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हालकुडे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. इस्माईल मुल्ला यांनी केले आहे.