उस्मानाबाद जिल्ह्यात १३ जुलै रोजी ३५ कोरोना पॉजिटीव्ह , १ मृत्यू 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यात आज १३ जुलै  (मंगळवार) रोजी ३५ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार १४८  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५७ हजार २३४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३८२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५३२ झाली आहे.