उस्मानाबाद जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी ७२८ पॉजिटीव्ह, ५ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६३६७
Apr 27, 2021, 19:28 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २७ एप्रिल ( मंगळवार ) रोजी तब्बल ७२८ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ५ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार ९९३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २८ जार ५५२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८७४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६३६७ झाली आहे.