गुड न्यूज : उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त होणार 

 

उस्मानाबाद  - कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron) या नवीन व्हेरिएंटने संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दहशतीचं वातावरण असलं तरी एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण केवळ ९ उरले असून, जिल्हा कोरोना मुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील वर्षी कोरोनाने धुमाकूळ घातला होता. मृत्यूचे आकडे चिंता वाढवत होते. एकाच दिवशी ३० हुन अधिक मृत्यू काळीज पिळवटून टाकणारे होते. मात्र आता लसीकरणामुळे कोरोना आटोक्यात आला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार ६८१ रुग्ण सापडले असून, ६५ हजार ५९६ रुग्ण बरे झाले आहेत. केवळ ९ ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत  २ हजार ७८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.