महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सुवर्णसंधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हयात सन 2021-22 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हयास 1210 हेक्टर  लक्षांकाचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उपलब्ध शेतातुन रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवुन देणे हे उद्दीष्ट साध्य करणेसाठी मोठया प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतामध्ये सलग लागवड,बांधावर  लागवड,पडीक जमिनीवर लागवड याकरीता शेतकऱ्यांना तीन वर्षात 100 टक्के अनुदान अदा करण्यात येते.

 लाभार्थी निवड निकष 

अनुसुचित जाती ,अनुसुचित जमाती, दारीद्र रेषाखालील लाभार्थी, भु -सुधार योजनेचे लाभार्थी,इंदीरा आवास योजनेचे लाभार्थी,कृषि कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्पभुधारक व सिमांत शेतकरी,अनु-जमातीचे व अन्य परंपरागत वननिवासी अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती यापैकी कोणत्याही एका अटीची पुर्तता करणारा लाभार्थी 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेवु शकतो.

 समाविष्ट फळपिके,वृक्ष,मसाला पिके,औषधी वनस्पती 

आंबा ,काजु,चिक्कु ,पेरु,डाळींब,सिताफळ इ. फळपिके तसेच बांबु,साग ,करंज ,गिरीपुष्प,   सोनचाफा,शेवगा इ. वृक्ष ,मिरी,जायफळ,दालचिनी व सुपारी, अर्जुन, अशोक, बेल, गुगुळ ,  शिवन ,रक्तचंदन,बेहडा,हिरडा,डिकमल,रीठा,वावडींग,करंज,पानपिंप्री वृक्षाची लागवड करता येते.

महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फुलपिके लागवड 

            सन 2021 पासुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तीक लाभार्थीच्या सलग शेतावर फुलपिके लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत वैयक्तीक लाभार्थीच्या शेतावर निशिगंध,मोगरा,गुलाब या फुलपिकांची लागवड करता येईल.फुलपिकांच्या बाबत लाभार्थींना एकाच वर्षात 100 टक्के अनुदान देय राहील.

            संपुर्ण फुलबाग लागवड कार्यक्रमासाठी पुर्वहंगाम मशागत करणे, खड्डे खोदणे,झाडाची लागवड करणे,पाणी देणे,किटकनाशके व औषधी फवारणी ,झाडाचे संरक्षण करणे इ. कामे लाभधारकाने स्वत नरेगा अंतर्गत तयार श्रमीक गटाव्दारे व जॉबकार्डधारक मजुराकडुन करुन

घ्यावयाचे आहे.तसेच 7/12 उताऱ्यावर लागवड केलेल्या फुलपिकांची नोंद घेणे लाभार्थांवर बंधनकारक राहील.फुलपिके लागवडीचा कालावधी दि.1 जुन ते 30 नोव्हेंबर पर्यंत राहील.

अ.क्र.

बाब

अंतर मिटर

कंद /कलमे संख्या

एकुण अनुदान

1

निशिगंध

      0.30 x 0.30

1,11,111

2,98,711

2

मोगरा

1 x 1

10,000

2,57,500

3

गुलाब

1 x 1

10,000

3,38,700

  महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेततळे अस्तरीकरण 

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषि विभागामार्फत भुस्तराप्रमाणे शेततळे घेणे बाबत 28 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परीस्थिती भिन्न भिन्न असल्यामुळे भुस्तराच्या वर्गवारीनुसार शेततळे खोदण्याचे 6 उपाय सुचविले आहेत. सदर उपायापैकी 100 टक्के मजुरामार्फत करावयाच्या 8 शेततळयांचे अस्तरीकरणास 6 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत  मजुराच्या सहाय्याने इनलेट आऊटलेट विरहीत शेततळे खोदणेसह अस्तरीकरणासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र.

शेततळयाचे आकारमान

एकुण मातीकाम (घन मीटर )

प्रस्तावित आर्थिक मापदंड

ज.जा.ऊ.य.डो/डों क्षेत्र

इतर क्षेत्र

मनुष्य दिवस

एकुण रक्कम रुपये

अकुशल टक्केवारी

कुशल टक्केवारी

मनुष्यदिवस

एकुण रक्कम रुपये

अकुशल टक्केवारी

कुशल टक्केवारी

1

10 x 10 x3

156.50

131.40

61549.62

51

49

117.97

58197.04

48

52

2

15 x 15 x3

441.00

365.78

135550.05

64

36

323.86

125373.25

61

39

3

20 x 15 x3

621.00

508.84

175771.68

69

31

448.90

161221.89

66

34

4

20 x 20 x3

876.00

720.91

243160.61

71

29

635.25

222365.45

68

32

5

25 x 20 x3

1131.00

929.57

307791.85

72

28

818.39

280800.93

69

31

6

25 x 25 x3

1461.00

1193.93

386895.61

73

27

1050.06

351971.71

71

29

7

30 x 25 x3

1791.00

1458.28

465999.36

74

26

1281.74

423142.49

72

28

8

30 x 30 x3

2196.00

1778.53

560833.00

75

25

1562.29

508337.00

73

27

 शेततळयांना प्लास्टीक अस्तरीकरण फिल्म दिल्यास यामध्ये पावसाळयामध्ये पडणारे पावसाचे पाणी साठवता येईल व संरक्षित ओलीतामुळे पावसात खंड पडला तरी पिक घेता येईल तरी शेतकऱ्यांनी प्लास्टीक अस्तरीकरणासह शेततळयाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपले कृषि सहाय्यक,कृषि पर्यवेक्षक,मंडळ कृषि  अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.