उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल
उस्मानाबाद - शशिकांत सारफळे रा. पोहनेर यांच्या घराचा कडी-कोंडा अज्ञाताने 6 एप्रिल रोजी पहाटे उचकटुन घरातील 82,000 रु. किंमतीचे दागीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : सुखदेव वाकुरे, रा. हिंगळजवाडी यांनी त्यांची हिरो पॅशन मो. सा. क्र. एम. एच. 25 एजी 3813 ही 5 एप्रिल रोजी उस्मानाबाद बस स्थानकात लावली असता 18.00 वा. अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा: अशोक इंगळे, रा. उमरगा हे 6 एप्रिल रोजी 09.45 वा. उमरगा बस स्थानकात बसमध्ये चढत असतांना त्यांचा स्मार्ट फोन अज्ञात चोरटयाने चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग: चालक -अस्लम फुलारी, रा. बसवकल्याण हे ट्रक क्र. के.ए. 56-5541 मधुन जालना –हैद्राबाद असा 20 मेट्रीक टन गहु घेउन जात होते. 5 एप्रिल रोजी 05.00 वा. ट्रक बसवंतवाडी फाटा येथे आला असता पाठीमागुन आलेल्या दोन मोटार सायकलवरील अज्ञात चौंघा पुरुषांनी मो. सा. रस्त्यात लावुन ट्रक अडवला. यावेळी त्या चौघांनी चालक फुलारी यांना रस्त्याबाजुच्या शेतात ओढत नेउन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील मोबाईल फोन, 30,000 रु. रोख रक्कम व ट्रक घेउन निघुन गेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.