लॉकडाऊन काळातही हाणामारी सुरूच 

उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी हाणामारी 
 

बेंबळी : शैलेश गोविंद पाटील, रा. बोरगाव राजे हे दि. 10.04.2021 रोजी 11.00 वा.  आपले मो. सा. वर बसुन शेताकडे जात होते. यावेळी गावकरी शाहीद पटेल यांनी त्यांचा ट्रक्टर अचानक आडवा लावला. यावरुन त्यांचेत वाद होवुन जावेद पटेल, कलीम, ईस्माईल पठाण, अकलाग, मैदाबी, शाहरुख शेख, यांनी शिवीगाळ करुन चापटाने व लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शैलेश यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 341, 143, 147, 149, 323, 504, 506, 188 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी : शाहीद पटेल, रा. बोरगाव राजे हे दि. 10.04.2021 रोजी 11.00 वा.  आपले ट्रक्टर घेउन जात होते. यावेळी गावकरी शैलेश पाटील यांनी त्यांचा ट्रक्टरला कट मारुन पुढे जाउन शिवीगाळ केली.  यावरुन त्यांचेत वाद होवुन शैलेश, प्रदिप, संदीप, ओंकार, महेश, यांनी शाहीद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शाहीद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम  143, 147, 149, 323, 504, 506, 188 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण : पांडुरंग निगुट, रा. आवाड शिवपुरा ता. कळंब हे 09 एप्रिल रोजी शेतात होते. यावेळी भाउ माधव हा तेथे आला व तु माझे मुलास शिव्या देत असल्याचे का सांगितले असे म्हणुन विटाने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निगूट यांनी दि. 10 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 326, 323, 504, 506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : साहेबराव कवडे, रा. कवडेवाडी ता. वाशी हे 10 एप्रिल रोजी शेतात होते. यावेळी भावकीतील बालाजी कवडे यांनी कांदयाचे पिकात बैलं का घातले असे म्हणुन भांडण काढुन शिवीगाळ करुन दगडाने व काठीने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कवडे यांनी दि. 10 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324,  504, 506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग : संभाजी कदम, रा. उमरगा चिवरी ता. तुळजापुर हे 09 एप्रिल रोजी घरासमोर होते. यावेळी गावकरी बळीराम दुधभाते, शेकाप्पा घोडके यांनी भांडण काढुन शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संभाजी कदम यांनी दि. 10 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 324,  323, 504, 506 , 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी : आयुब सय्यद, रा. खेड ता. उस्मानाबाद हे 09 एप्रिल रोजी घरासमोर होते. यावेळी गावकरी मुस्तफा शेख, जावेद शेख यांनी मागील भांडणाचा वाद काढुन आयुब यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली व डोकीत दगड मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या आयुब यांनी दि. 10 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम  324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.