बारावीच्या वार्षिक परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदत वाढ

 

 उस्मानाबाद :-पुणे येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च  माध्यमिक शिक्षण मंडळाने 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेची ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि.18 जानेवारी-2021 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

       अर्ज सरळ डाटाबेस वरुन नियमित शुल्कासह ऑनलाईन पध्दतीने दि.15 डिसेंबर 2020 ते दि.04 जानेवारी 2021 या कालावधीत भरावयाचे हे अर्ज भरण्यास ते आता मुदतवाढ देण्यात आली आहे.हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.

    उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र,कला आणि वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरळ डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाची अंतिम मुदत दि.18 जानेवारी-2021 असून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम नियमित विद्यार्थी (होकेशनल कोर्स) पुनर्परिक्षार्थी,यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) अर्ज प्रचलित पध्दतीने ऑनलाईन पध्दतीने भरावयाची तारखाही दि.18 जानेवारी-2021 अशीच आहे.

         उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करुन चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाची मुदत दि.25 जानेवारी 2021 आहे.अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांची अर्ज भरुन सादर केल्यांनतर कॉलेज लॉगीन मधून प्री-लीस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल,कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्जात नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी आणि त्याबाबत प्री-लिस्ट विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.त्यांनतर सदर प्री-लिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावयाची आहे.

  उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्री-लिस्ट जमा करावयाची तारीख गुरुवार दि.28 जानेवारी 2021 राहील.बारावी परीक्षेचे अर्जही  ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्याच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावेत,असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांने केले आहे.