उस्मानाबाद तालुक्यात अतिवृष्टी
उस्मानाबाद - तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले, हा पाऊस इतका भीषण होता की, त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांची माती वाहून गेली आहे, शेतात पेरणी केलेल्या पिकांचे, सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
.
उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी, लासोना, घुगी, मेंढा, सांगवी, कामेगाव, राजे बोरगाव, बोरखेडा, कनगरा आदी गावाला याचा फटका बसला आहे. नैसर्गिक संकटामुळे, शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, अनेक रस्ते व रस्त्यावरील पुलाचे अत्यन्त नुकसान झाले आहे, अनेक शेताना तलावाचे स्वरूप आले आहे, पावसामुळे तेरणा आणि सवळा नदी संगम, आणि दोन्ही नद्या काठोकाठ भरून वाहू लागल्या आहेत.
लासोना येथे अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील काही व्यक्ती गावाकडे परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रवाणी-लासोना या पुलावरून एक व्यक्ती वाहून गेला आहे, तशाच प्रकारे बोरखेडा गावालगत असलेल्या ओढ्यावरील पुलावरून एक मोटारसायकल वाहून गेली असून एक युवक बेपत्ता आहे. यासाठी प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून त्या बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले जात आहेत,
भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचने नुसार त्या सर्व अपत्तीग्रस्त भागाचा भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व सहकार्यांनी दौरा केला.याप्रसंगी जिल्हापरिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, माजी जि.प अध्यक्ष नेताजी पाटील, तालुका सरचिटणीस नामदेव नायकल, तसेच लासोना येथील सरपंच संगु स्वामी, युवराज ढोबळे, दादा पठाण, संजय दळवी, प्रेमनाथ पाटील, अभय इंगळे, तसेच सर्व नुकसान ग्रस्त भागातील गावचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना काळे म्हणाले की, हवामान बदलामुळे अतिवृष्टी येणे आता नविन राहीले नाही अतिवृष्टीत पीक व शेतनुकसानीपासुन वाचण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमाचा हप्ता भरला नसेल त्यांनी तातडीने हप्ता भरुन घ्यावा तसेच सन २०२० मधील शेतकऱ्यांना पीकविमा मिळवुन देण्यासाठी भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातुन कटीबध्द आहोत.