कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना 

 19 अधिकाऱ्यांची नियुक्ती 
 

उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हास्तरीय जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे .त्यासाठी नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक 1077 आणि 8272896400 हा उपलब्ध करून देण्यात आला आहे . याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज जरी केले आहेत .


 या कक्षाचे काम आजपासून सुरू झाले आहे .या कक्षात 19 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . या नियंत्रण कक्षातील हेल्पलाइनवर कोरोनाबाबत , जिल्ह्यातील कोरोनाच्या उपचराबद्दल आणि सोई सुविधाबद्दल माहिती देण्यात येणार आहे . विविध विभागांकडून दैनंदिन अद्ययावत माहिती घेण्यासाठी समन्वय अधिकारी , त्यांच्या अधिनस्त अधिकारी -- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी एकत्रित महिती उपलब्ध होणार आहे .या नियंत्रण कक्षाचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे . 


हा नियंत्रण कक्ष उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांच्या नियंत्रणाखाली असेल . श्री . काळे हे संनियंत्रण अधिकारी असतील , तर सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी असतील . इतर 17 जण नियंत्रण कक्ष कामकाज अधिकारी म्हणून काम पाहतील . यात उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) महेंद्रकुमार कांबळे , उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) शुभांगी आंधळे , उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन - मध्यम प्रकल्प क्र -2 ) राजकुमार माने , उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) नितीन दातार , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंतला , अन्न व औषध प्रशासनचे सहस्यक आयुक्त ( औषध ) दीपक सिद , सहायक आयुक्त( अन्न ) एस . बी . कोडगीरे , जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक संजय बाबर , जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री हानबर , निवासी वैदकीय अधिकारी डॉ सचिन बोडखे , महात्मा फुले जन असरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक श्री भुतेकर , जि प चे मुख्य लेख व वित्त अधिकारी एस जी केंद्रे ,तहसीलदार ( संगायो ) श्रीमती मनीषा मोरे , नायब तहसीलदार रोहन काळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती तेलोरे.या नियंत्रण कक्षातील सदस्यांनी आणि वॉर रूम अधिकाऱ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांची दररोज 24 तास ( 24 x 7 )  जिल्हा नियंत्रण कक्षात उपस्थिती असणार आहे .