कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना

 

  उस्मानाबाद - महामारीत ज्या बालकांचे पालक मृत्यु मुखी पडले आहेत. अशा बालकांसाठी तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक रुग्णालय मध्ये दाखल आहे. अशा बालकांचे संपुर्ण संरक्षण,संगोपन,कायदेशीर हक्क व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महिला व बालविकास विभागामार्फत  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर कृतीदल गठीत करण्यात आली आहे.या कृती दलाची  बैठक दि.21 मे 2021 रोजी ठिक 11.00 वा. जिल्हाधिकारी  यांच्या कार्यालयात घेण्यात आली.

       त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे, जिल्हा शल्य चिकित्स्का डॉ.डी के.पाटील,सचिव,विधीसेवा प्राधिकरण,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री बी.एच.निपाणीकर,अध्यक्ष बाल कल्याण समिती श्री ए.डी.कदम,मुख्यधिकारी नगर परिषदेचे श्री. यलगटटे, परिविक्षा अधिकारी श्री. एन.डी.इरकल, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्रीमती कोमल धनवडे आदी उपस्थित होते. 

        या वेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांनी सर्व रुग्णालयात चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमाकांचा फलक दर्शनी भागात लावण्याच्या  सुचना दिल्या, त्याच बरोबर वैद्यकीय पथक तयार करुन प्रत्येक बालगृहातील प्रवेशितासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात यावे,असे आदेशित केले.कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पोलीस दलाने सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करुन दयावे अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार तस्करी सारख्या गुन्हेगारीत सापडणार नाहीत. याची दक्षता पोलीस दलाने घ्यावी, तसेच जिल्हा विद्यी सेवा प्राधिकरण यांनी कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या आर्थिक व  मालमत्ता विषय हक्क अबाधित राहातील याची दक्षता घ्यावी. सदर हक्क मिळु देण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यासाठी अवश्यकते नुसार न्यायीक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असे निर्देश  जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे.

        कोरोना महामारीत अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशावेळी त्यांच्या पाल्यांची देखभाल करण्यासाठी नातेवाईक असमर्थता दर्शवतात तर कांही वेळा दोन्ही पालकांचा मृत्यु झाल्याने त्यांचे मुलांची संरक्षणाचा आणि संगोपनाचा प्रश्न निर्माण होतो. याच्यासाठी जिल्हास्तरावर कृती दलाची स्थापना केली आहे.ज्या ठिकाणी असे बालके आढळुन येतील तेंव्हा   1) चाईल्ड  लाईन हेल्प्‍ नंबर.1098, बाल कल्याण समिती  उस्मानाबाद-9405749325,जीवन विकास मुलांचे बालगृह  तडवळे   -9527799139,श्री गणेश शिक्षण  प्रसारक मंडळ खडगांव रोड,लातुर  (शिशुगृह)-9325028884, जिल्हा बाल संरक्षण कक्ष - 7387907845, 9404040435,संरक्षण अधिकारी  तुळजापुर -9763332222, संरक्षण अधिकारी भुम-9689882098,संरक्षण अधिकारी  कळंब-8888964740,संरक्षण अधिकारी परंडा-9765396443,संरक्षण अधिकारी वाशी -9049167667,संरक्षण अधिकारी  उमरगा व लोहारा --  9673443020,जिल्हा महिला व बाल वि कास कार्यालय उस्मानाबाद-02472- 222592, जिल्हा रुगणालय,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य्‍ केंद् व खाजगी कोवीड हॉस्पीटल मध्ये खालील क्रमांकांचा फलक दर्शनी भागात लावण्यात यावा.   

चाईल्ड  हेल्प्लाईन नंबर -1098 0 ते 6 वयोगटासाठी बालकांसाठी शिशुगृह श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ खडगाव रोड,लातुर, 6 ते 18 वयोगटातील बालकांसाठी जीवन विकास मुलांचे बालगृह तडवळा ता.जि.उस्मानाबाद,बाल कल्याण समिती  संपर्क क्र. 9405749325,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी संपर्क क्र.7387907845,9404040435 याद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री बी.एच.निपाणीकर यांनी केले आहे.