उस्मानाबाद एसटी आगारात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न Video 

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद एसटी आगारातील  एका कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल  ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला, पण इतर कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्यास रोखल्याने या कर्मचाऱ्याचा जीव वाचला. महादेव नरवडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण  करण्यात यावे,यासह अन्य मागण्याकरिता एसटी कर्मचाऱ्याचे गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरु आहे. शासन त्यावर तोडगा काढत नसल्याने कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहेत. 

कळंबचा एक कर्मचारी सच्छिदानंद पुरी हा काल झाडावर चढून फास घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज उस्मानाबाद आगारात महादेव नरवडे हा कर्मचारी हातात पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता.गंभीर बाब म्हणजे हा कर्मचारी एसटी आगारातील डिझेल पंपाजवळ हा प्रयत्न करीत होता, त्यामुळे मोठा  अनर्थ ओढवला असता. अन्य कर्मचाऱ्यांनी  प्रसंगावधान राखून त्यास रोखल्याने  या कर्मचाऱ्याचा जीव वाचला.