खा. ओमराजे  निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 

 

उस्मानाबाद  - शिवसेनेने नेते आणि लोकप्रिय खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.17 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील यांच्या हस्ते सकाळी 9:00 वाजता-धारासुर मर्दिनी येथे आरती, सकाळी 9:30 वाजता:ख्वाजा शमसोद्दीन गाझी  दर्गा येथे चादर चढवणे ,सकाळी10:00:-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे  हे कार्यक्रम पार पडणार आहेत. 


या सर्व कार्यक्रमास  शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टिंन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असे देखील सुचवण्यात आले आहे.