उस्मानाबादेत बदलत्या हवामानामुळे सर्दी, तापाचे रुग्ण वाढले

 

उस्मानाबाद - उस्मानाबादेत बदलत्या  हवामानामुळे  सर्दी, तापाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाची गर्दी वाढली आहे. काही खासगी डॉक्टर कोरोना तसेच नको त्या टेस्ट करायला लावून रुग्णाची लूट करीत आहेत. 


सततच्या रिपरिप पावसांनंतर गेल्या काही दिवसापासून हवामान बदलले आहे. आज दिवसभरात कडक उन्ह पाहायला मिळाले असले तरी या घटकेत बदलणाऱ्या हवामानामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे.

सर्दी, ताप , घसा खवखवणे , खोकला या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने  दवाखान्यात मोठी गर्दी होत आहे.

मोकाट जनावरे, वराहांचा मुक्त संचार, कचऱ्याचे ढीग , तुंबलेल्या नाल्या, सचलेले पाण्याचे डबके ,यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.यामुळे साथ रोग्यांचे प्रमाण वाढले आहे.या " व्हायरल आजाराने" नागरिकांची चिंता वाढवली आहे.