धनंजय शिंगाडे यांच्यामुळे न.प. कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला 

 

उस्मानाबाद - सातवा वेतन आयोग व निवृत्तीवेतन  मिळावे , या मागणीसाठी नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू होते, हा प्रश्न अखेर बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या मध्यस्थीमुळे मार्गी लागला आहे. 

उस्मानाबाद नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी  सातवा वेतन आयोग व निवृत्तीवेतन  मिळावे म्हणून गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. या उपोषणाला बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे  पाठींबा देऊन हा प्रश्न निकाली लागावा यासाठी प्रयत्न केले. 

न. प. मुख्याधिकारी  यांनी  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पत्र दिले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, सातवा आयोगचा पहिला हप्ता देण्यासाठी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद येथे कायम ठेव रक्कम आहे . येत्या सात दिवसात निवृत्त कर्मचाऱ्यांना तो देण्यात येईल.