डॉ.पद्मसिंह पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा  

 

धाराशिव  - राज्याचे माजी गृहमंत्री , लोकनायक डॉ.पद्मसिंह पाटील यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला.  

 डॉ.पद्मसिंह पाटील  यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. सकाळी धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते विशेष म्हणजे खेड्या-पाड्यातून आलेली सर्वसामान्य जनता डॉ.साहेबांचे औक्षण करून, पेढे भरवून, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.

दिव्यांग बंधू- भगिनींना तीन चाकी सायकल वाटप

उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. ट्रस्ट  च्या वतीने दिव्यांग बंधू  भगिनींना  सायकल वाटप करण्यात आले त्याप्रसंगी  ट्रस्टच्या    विश्वस्त सह आ. राणाजगजीतसिंह पाटील व व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांची प्रमुख उपस्थिती होते.

तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णलाय, उस्मानाबाद  ब्लड  सेंटर च्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थी आणि स्टाफ यांनी रक्तदान केले. तसेच यावेळी  महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपणही  करण्यात आले  व शासकीय स्त्री रुग्णालय,उस्मानाबाद येथे नारळपाणी वाटप  करण्यात आले.या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी  महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने ,डॉ. डी डी दाते, डॉ.प्रशांत कोल्हे ,डॉ. एन एस तौर ,प्रा सुजाता गायकवाड ,प्रा.शीतल पवार ,प्रा. यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटीलयांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत शिनगारे व मित्र परिवाराच्या वतीने कामगार कट्टा, ताजमहल टॉकीज समोर, धाराशिव येथे मेघ राणाजगजितसिंह पाटील व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते कामगार बंधूंना कपडे व भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले.डॉ.साहेबांनी नेहमीच कष्टकरी, शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. त्यांचा विचार समोर ठेऊन त्यांच्या जन्मदिनी या समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तुळजापूर येथील युवा नेते विनोद (पिटूभैय्या) गंगणे यांच्यावतीने तुळजाभवानी मंदिर समोर बांगड्या व इतर साहित्य विक्री करून उदर निर्वाह करणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

ग्रामदैवत धारासूर मर्दिनी देवी येथे मेघ पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) दर्गाह येथे चादर चढवून डॉ.साहेबांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

लोकनायक डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते मल्हार पाटील यांनी आई तुळजाभवानी मंदिरात आरती करून दर्शन घेतले व डॉ.साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली. तसेच युवा नेते श्री.विनोद पिट्टू गांगणे भैय्या यांच्या वतीने तुळजापूर येथे मिठाईचे वाटप करण्यात आले.

तुळजाभवानी स्टेडियम येथे क्रिकेट उस्मानाबाद प्रीमियम लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते मल्हार पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेतला आहे. सदरील सर्व सामाजिक उपक्रमास प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, आयोजक व नागरिक उपस्थित होते.