जिजामाता वसतीगृहातील फॅसिलिटी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट 

 

उस्मानाबाद -  येथील जिल्हा  रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्र आणि कोरोना टेस्ट सेंटरला तसेच जिजामाता  वसतीगृहातील कोरोना फॅसिलिटी केंद्रास भेट देऊन जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांनी पाहणी करून मार्गदर्शक सूचना केल्या .यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले  उपस्थित होत्या . 

उस्मानाबाद शहरातील जिजामाता वसतीगृहात तयार करण्यात आलेल्या फॅसिलिटी सेंटरमध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी कोरोना संबंधी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . येथे येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करून पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत आहे 

 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाच्या विषाणूची तीव्रता किती प्रमाणात आहे यावरून त्याच्यावरील उपचाराची दिशा निश्चित केली जात आहे . सौम्य सुरूपाची लक्षण असलेल्या रुणांना गृह विलंगिकरनात ठेवण्याची परवानगी देण्यापूर्वी त्याच्या घराची माहिती नगर पालिका कर्मचाऱ्यांमार्फत घेऊन त्यांचा घरी तो रुग्ण विलगिकरनात राहू शकतो तरच त्यास त्याच्या घरी विलगिकरनात ठेवण्याची परवानगी त्याच्याकडून फॉर्म भरून घेऊन देण्यात येत आहे . 


कोरोनाचे गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णास जिल्ह्यातील अकरा सीसीसी केंद्रात पाठवण्यात येत आहे तर कोरोनाची अति गंभीर स्वरूपाचे लक्षणं असलेल्या रुग्णास जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता कक्षात दाखल करण्यात येत आहे , अशी माहिती या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी श्री दिवेगावकर यांनी दिली . जिजामाता वसतीगृहातील फॅसिलिटी केंद्रात कोरोना टेस्ट केलेल्या  आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती फॅसिलिटी अँपवर तातडीने भरण्यात येत असल्याने कोणत्या रुग्णावर कोठे उपचार करण्यात येत आहेत याची कल्पना येते आहे .


त्याशिवाय  उस्मानाबाद शहरात उस्मानाबाद तहसीलद कार्यालय आणि नगर पालिकेच्या माध्यमातून वॉर्ड निहाय आरोग्य समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत त्याच्या मार्फत गृह विलगिकरण करण्यात आलेल्या रुग्णाच्या घरावर गृह विलगिकरनाचे स्टिकर लावून या समितीतील सदस्य तो रुग्ण घरातच रहातो का ? हे तपासण्याबरोबरच त्याची रोज थर्मल गण आणि ऑक्सिमिटरने आरोग्य तपासणी करतात , योग्य त्या सूचना करतात . विशेष म्हणजे गृह विलगिकरणातील रुग्णास एक खास किट दिले जात आहे . या किटमध्ये आवश्यक औषधी , मास्क , सॅनिटायझर , वैदकीय सेवाबाबतची माहिती , गृह विलगिकरनात घ्यावयाची दक्षता आदी माहिती आहे, असेही श्री . दिवेगावकर यांनी सांगितले आहे .  भेटी दरम्यान उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमोल सूर्यवंशी , नायब तहसीलदार तुषार बोरकर आदी उपस्थित होते .