कृषी व गॅस सिलेंडर सेवासाठी काही अटीवर लॉकडाऊनमध्ये सूट

 

 उस्मानाबाद -कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनच्या काळात काही अत्यवश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.या सेवा पुरवणात्यांनी कोरोनाशी संबंधित नियमांचे पाल करुन सेवा द्यावयाच्या आहेत.त्यात कृषी  विषयक सेवा,अत्यावश्यक सेवांमधील मटन,चिकन,अंडी,मासे,पोल्टी,सेवाशी संबंधित कार्यालये,दूरसंचार सेवा, गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सी यांना ही सूट दिली आहे.

      सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस अटी व शर्तींवर देण्यात आलेल्या परवानगीमध्ये ती सेवा सुरळितपणे सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रासंगिक,अनुषंगिक सेवांचाही समावेश असेल. यामध्ये विमानतळावर आवश्यक असलेली मालमत्तेची हाताळणी, तिकिटींग इ. प्रासंगिक,अनुषंगिक बाबींचाही समावेश आहे.परवानगी असलेल्या उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या अनुषंगिक बाबी आणि उत्पादन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी तसेच तयार झालेले उत्पादन पाठविण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही प्रमाणपत्रे, कार्यालयीन प्रक्रिया यांनाही परवानगी राहील.ज्या उद्योगात 500 पेक्षा जास्त कामगार असलेल्या उद्योगांनी सर्व सोईसुविधांनी युक्त विलगीकरण केंद्र (Quarantine Center) उभारणे आवश्यक आहे. जर उद्योगाच्या आवाराबाहेर अशा प्रकारचे विलगीकरण केंद्र स्थापन केले असेल तर संसर्ग झालेल्या व्यक्तीस त्याठिकाणी हलविताना तो कोणत्याही इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.

        ज्या कृषी विषयक सेवांना अत्यावश्यक सेवांमध्ये सूचिबद्ध केले आहे. त्या सेवांमध्ये कृषी विषयक कामे सुरळितपणे सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेल्या संबंधित बाबी जसे कृषी अवजारे, बियाणे, खते, उपकरणे व त्यांची दुरुस्ती या सेवांचा समावेश राहील.अत्यावश्यक सेवांमध्ये सूचिबद्ध करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये चिकन, मटन, अंडी, मासे, पोल्ट्री इ. दुकाने यांचा समावेश राहील.

          पुढील नमूद बाबींचा आता अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात येत आहे.सेबी (SEBI) ने मान्यता दिलेल्या बाजारांशी संबंधित सर्व कार्यालयांतील मुलभूत सुविधा संस्था जसे स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लिअरिंग कार्पोरेशन्स इ. आणि सेबी (SEBI) कडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ. दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती/देखभालीसाठी आवश्यक असणा-या बाबी,सेवा.गॅस सिलेंडर पुरवठा.

या आदेशाची अंमलबजावणी दि. 05 एप्रिल-2021 रोजी रात्री 08.00 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहेत.आदेश दि.30 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.