उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर

आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आजितदादांचा पहिलाच उस्मानाबाद दौरा 
 
अजितदादा सासुरवाडीला काही गिफ्ट देणार का ? 

 उस्मानाबाद -  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार दि. १८  जून  रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या  दौऱ्यावर येत आहेत. आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत. तेर ही  अजितदादांची सासुरवाडी आहे. या दौऱ्यात सासुरवाडीला काही गिफ्ट देणार का ? याकडं लक्ष वेधलं आहे. 

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे -   उपमुख्यमंत्री  पवार यांचे शासकीय विमानाने मुंबईहून सकाळी 7:50 वाजता औरंगाबाद येथे आगमन होणार आहे.औरंगाबाद  येथून मोटारीने बीड येथून 12:45 वाजता गिरवली  (ता.भूम) येथे त्यांचे आगमन होणार आहे.12:45 ते 1:45 या कालावधीत माजी आमदार राहूल मोटे यांच्याकडे त्यांचा वेळ राखीव आहे.

गिरवली  येथून दुपारी  2:45 वाजता त्यांचे उस्मानाबाद येथे आगमन होणार आहे. दुपारी 3:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते जिल्हयातील कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा  आणि जिल्हा खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत.दुपारी 4:30 वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल. सायंकाळी 5:15 वाजता पवार मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील.