कोविड मनाई आदेश झुगारुन दुकान चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

 परंडा: सोहल नियामत तुटके, रा. परंडा यांनी दि. 09 जून रोजी 18.15 वा. सु. परंडा येथील ‘बिकानेर स्वीट होम’ हे दुकान व्यवसायास चालू ठेउन अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 विनीयमन कलम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उपचारादरम्यान रुग्णालयातून पलायन करणाऱ्या कोविड रुग्णावर गुन्हा दाखल

तुळजापूर: उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे उपचार घेत असलेले कोविडचे आंतररुग्ण  ज्ञानदेव शिवाप्पा गायकवाड, वय 60 वर्षे, रा. वानेगांव, ता. तुळजापूर हे दि. 08 जून रोजी 13.30 वा. वैद्यकीय पथकास काहीही न सांगता रुग्णालयातून परस्पर निघून गेले. अशा प्रकारे त्यांनी कोरोना संसर्गाची शक्यता निर्माण होईल अशी निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन वैद्यकीय अधिकारी- श्री. सतिश आंबुरे यांनी दि. 09 जून रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस नाकाबंदी दरम्यान 379 कारवायांत 84,800 ₹ ‘तडजोड शुल्क वसुल

उस्मानाबाद पोलीस दलातर्फे महत्वाच्या रस्त्यांवर सकाळी 08.00 ते 20.00 वा. दरम्यान पोलीस नाकाबंदी केली जात असुन मोटार वाहन कायदा- नियम व कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांची अंमलबजावनी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान दि. 09 जून रोजी उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी एकुण 340 कारवाया करुन नियम भंग करणाऱ्यांकडून 84,800 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

 
कोविड- 19: दि. 09.06.2021 रोजी 154 पोलीस कारवायांत 33,400/-रु. दंड वसुल 

उस्मानाबाद : कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलामार्फत दि. 09.06.2021 रोजी खालील दोन प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 8 कारवायांत- 4,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 146 कारवायांत 29,400/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.