कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्ह्यात पाच  दिवसांत १९६ रुग्ण 

 कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण 
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे. जिल्ह्यात सोमवारी  १८, मंगळवारी ३५ आणि बुधवारी ४०, गुरुवारी २३, शुक्रवारी ८०  असे १९६  रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २४६ झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या २० च्या आत आली होती, पण नवा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आल्यापासून जिल्ह्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गुरुवार दि., ८ जानेवारी रोजी जिल्हयात ८० रुग्णाची भर  पडली. त्यात उस्मानाबाद ३१, तुळजापूर २२, उमरगा १०, लोहारा ३, कळंब ७, वाशी ४, भूम ३ असा समावेश आहे 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार ९ रुग्ण आढळले असून , पैकी ६५ हजार ६८२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.