कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ मे रोजी ३९२ पॉजिटीव्ह, १२ मृत्यू 

कोरोना रुग्ण बरे होण्याचे ८९.२३ टक्के तर ‌ मृत्यूचे २.२५ प्रमाण टक्के
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २३  मे ( रविवार ) रोजी तब्बल ३९२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १२ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली आहे पण मृत्युदर कायम आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५२ हजार ३६९   रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४६  हजार ७३१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११८२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४४५६ झाली आहे .

आज आलेल्या अहवालानुसार स्वॅब, ॲन्टिजेन व एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद - २६, ७६ (१०२), तुळजापूर - ३ - ४८ (५१), उमरगा- ४ - ४५ (४९), लोहारा- २४ - २६ (५०), कळंब- २३ - ३३ (५६), वाशी- १  - ३२ (३३), भूम-१  - २१ (२२) व परंडा- ६ - २३ (२९) अशी एकूण ८८ - ३०४ (३९२) रुग्ण संख्या आहे.