उस्मानाबादेत जिल्हा स्त्री रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिलेची अवहेलना 

महिला कोरोना निगेटिव्ह असताना पॉजिटीव्ह दाखवून बाळंतपणा करण्यास नकार 
 
नातेवाईकांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल 

उस्मानाबाद  - येथील  जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये बाळंतपणासाठी आलेल्या एका  महिलेची अवहेलना  करण्यात आली. तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असताना पॉजिटीव्ह दाखवून बाळंतपणा करण्यास नकार दिला, त्यामुळे महिलेला नाईलाजास्तव सोलापूरला जावे लागले. याप्रकरणी  नातेवाईकांनी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याकडे  लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. 

उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये येडशी येथील गर्भवती महिला शाहीन अझरोद्दीन पटेल ही  १३ जून रोजी बाळंतपणासाठी आली असता तिची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यावेळी तिचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले आणि बाळंतपण करण्यास नकार देण्यात आला. परंतू सदर  महिलेला कोरोना सदृश  कोणतेही लक्षण नसल्यामुळे महिलेच्या नातेवाईंनी उस्मानाबाद येथीलच डॉ. .मुळे यांचे श्रीयश हॉस्पीटलमध्ये चाचणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला. 

सदर रिपोर्ट घेऊन नातेवाईक परत जिल्हा स्त्री रुग्णालयात गेले असता सदर महिलेला  आयुर्वेदिक कोविड सेंटर येथे पाठवण्यात आले परंतु त्याठिकाणी प्रसूतिवेळी जर  सिजर करण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी सिजर होत नसल्याचा सल्ला कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिला  त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेण्याचे ठरवले. त्यानंतर याच रुग्णाचा सोलापूर येथे आर टि पी सी आर व अँटिजन टेस्ट करण्यात आली दोन्ही रिपोर्ट  निगेटिव्ह आले असून सदर रुग्ण हा जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहे.त्या महिलेला मुलगी झाली आहे आई व बाळ ठणठणीत आहे. 

सदर घडलेला हा प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या  हलगर्जीपणामुळे झाला आहे . अशा चुकीच्या रिपोर्ट मुळे नाहक एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो . संबंधित जे कोणी या प्रकरणांमध्ये चुकीची माहिती देऊन रुग्णांची हेळसांड केली आहे त्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुग्णाचे नातेवाईक रफिक  पटेल रा येडशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे .