आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन 

 

उस्मानाबाद  - शिवसेना जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून सांजा येथील मुस्लीम समाज बांधवांच्या सभागृहाची १० लक्ष रु निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन आ.कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, माजी तालुकाप्रमुख दिलीप जावळे, माजी शहरप्रमुख प्रविण भैय्या कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे,विजय राठोड, युवा सेना तालुका प्रमुख वैभव वीर,शिव अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाध्यक्ष अमीर शेख, भीमा अण्णा जाधव, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान,उपशहर प्रमुख बापू साळुंके, विभागप्रमुख अमोल मुळे, धनंजय इंगळे, सौदागर जगताप,  युवासेना विभागप्रमुख ओंकार आगळे, सरपंच संताजी पवार, उपसरपंच सतीश सूर्यवंशी, गफूर शेख ,हणमंत सूर्यवंशी, नाना सूर्यवंशी राकेश सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी संदीप गायकवाड यांच्यासह  शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असल्याने सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे, या अगोदरही आपण जनतेच्या समस्या सोडवत होतोच पण आता त्याहुन अधिक जनतेला आधार देण्याची गरज असुन यामध्ये शिवसैनिकांनी कुठेही कसुर सोडु नये, 

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमुळे जिल्ह्यात रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व वर्षानुवर्षे फक्त चर्चेत असलेले मराठवाडा कृष्णा प्रकल्पाचे पाणी प्रत्यक्षात आपल्या भागात येत आहे. जुन 2023 पर्यंत हे पाणी आपल्या तालुक्यातही येणार आहे, दुधाळवाडी प्रकल्पापर्यंत हे पाणी यावे यासाठी खास प्रयत्न केले.परिणामी त्याला मंजुरी मिळाल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र आता ओलीताखाली येणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.