उस्मानाबाद रेल्वेस्थानकावर लवकरच ‘कोच इंडिकेटर’

मध्यरेल्वेचे महाप्रबंधक अनिल लाहोटी यांची माहिती
 

उस्मानाबाद-  उस्मानाबाद रेल्वेस्थानकाकरिता कोच इंडिकेटर बसविण्याची मंजुरी मिळाली असून लवकरच या कामास सुरूवात होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल लाहोटी यांनी दिली.

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल लाहोटी उस्मानाबाद येथे शुक्रवारी पाहणी दौर्‍यावर आले होते. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने लाहोटी यांचे रेल्वेस्थानकात स्वागत करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हैद्राबाद-हडपसर रेल्वे पुण्यापर्यंत नेण्यात यावी, कारण यात प्रवाशाचा पैसा व वेळ वाया जात आहे. प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच लातूर-मुंबई-बिदर-मुंबई या रेल्वेगाडीस नवीन एल.एच.बी कोच बसविण्यात यावे व रेल्वे डब्यांची संख्या वाढविण्यात यावी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नागपूर-कोल्हापूर गाडी नियमित करण्यात यावी, हैद्राबाद-हडपसर गाडी नियमित करण्यात यावी, या व इतर मागण्या करण्यात याव्यात. त्या सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करून पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी उस्मानाबाद जिल्हा व्यापारी संघाच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत यांच्यासह उपाध्यक्ष संजय मोदाणी, सदस्य धनंजय जेवळीकर, विशाल थोरात, आशिष मोदाणी, सचिन मिनियार, विष्णूदास सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती.