कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण तीनच रुग्ण

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉजिटीव्ह तीनच रुग्ण असून, चौथ्या रुग्णाबद्दल आपणाकडे माहिती नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण सापडल्याचे वृत्त ( उस्मानाबाद लाइव्ह नव्हे ) काही चॅनल्सवर दाखवल्यानंतर   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे  यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत आपणाकडे अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले. 

तिसऱ्या रुग्णाचे मरकज कनेक्शन ? 

काल निष्पन्न झालेला तिसरा रुग्ण उमरगा येथील रहिवासी असून, त्याचे वय ४२ आहे. तो मेकॅनिक असून पुण्यात राहतो. तो दिल्लीच्या मरकज येथे गेल्याचे वृत्त असून, तो माहिती देत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.