श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीजचा बॉयलर पूजन सोहळा उत्साहात

 

तुळजापूर - देवकुरुळी येथील  श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा बॉयलर पूजनाचा समारंभ उत्साहात संपन्न झाला.सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश काका कोयटे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष.सुरेश आण्णा वाबळे यांच्या प्रमुख उस्थितीमध्ये झाला.

यावेळी संत नागेबाबा मल्टीस्टेट चे अध्यक्ष कडूभाऊ काळे, लोकमंगल मल्टीस्टेटचे अध्यक्ष रोहन देशमुख, मोहेकर मल्टीस्टेट चे अध्यक्ष हनुमंत मडके,  यशदा मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुधीर सस्ते, पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट चे अध्यक्ष जयप्रकाश राजेनिंबाळकर, लातूर मल्टीस्टेट चे अध्यक्ष इसरार सगरे, साईआदर्श मल्टीस्टेट चे अध्यक्ष .शिवाजी आप्पा कपाळे, आदर्श महिला पतसंस्थेचे अध्यक्ष .हनुमंत भुसारे, यशवंत मल्टीस्टेट चे अध्यक्ष .सतीश दंडनाईक, नाथ मल्टीस्टेट चे अध्यक्ष  सिध्देश्वर वायकर, साईराम मल्टीस्टेटचे अध्यक्षशाहीनाथ परभने,श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

 कार्यक्रमास श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे अध्यक्ष .व्यंकटेश कोरे, सतीश सोमाणी, ॲड.श्री.सचिन मिनियार, प्र.का.सदस्य ॲड.अनिल काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,साहेबराव घुगे, नागेश नाईक, शिवाजी बोधले, नारायण नन्नवरे, विजय शिंगाडेबालाजी शिंदे, .विजय रोकडे,  श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड चे कर्मचारी व सिध्दीविनायक परिवाराचे हितचिंतक व परिसरातील शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले.  आपल्या प्रास्ताविकामध्ये तुळजापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन या भागात कारखाना उभारण्याचा संकल्प केल्याचे सांगितले व कारखान्यामध्ये ऊस घातलेल्या दिवसापासून १५ दिवसामध्ये उसाचे एकरकमी बिल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल याची खात्री सुद्धा दिली.अध्यक्षीय भाषणामध्ये ओमप्रकाश काका कोयटे यांनी श्री सिध्दीविनायक परिवाराच्या या नवीन प्रकल्पाच्या उभारणीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रतीक देवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश कामटे यांनी व्यक्त केले.