कारगिल विजय दिनानिमित्त आ.कैलास पाटील यांचे रक्तदान 

रक्तदान करून शहीदांना अभिवादन
 

उस्मानाबाद  - कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शिराढोण येथे आयोजीत रक्तदान शिबीरामध्ये स्वतः आमदार कैलास घाडगे पाटील यांनी रक्तदान करुन शहीदांना अभिवादन केले.

 शिराढोण पोलीस ठाण्याच्या वतीने (ता. २६) रोजी सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिराढोण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांनी परिसरातील जनतेला रक्तदान करण्याचे अवाहन केले होते. त्यानुसार मोठ्या संख्येने रक्तदानासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. मात्र या गर्दीत असा एक चेहरा दिसला की, त्याने सगळ्यांमध्ये कुतुहल व चर्चा सूरु झाली. तो चेहरा म्हणजे उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील हा होता. 

कोणत्याही उपक्रमात अगदी तरुणांमध्ये व त्या आयोजकांमध्ये मिसळुन तो उपक्रम यशस्वी करण्यामध्ये आमदार घाडगे पाटील यांचा स्वभाव आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मतदारसंघातील जनतेला आला, त्यानी तरुणासोबत स्वतः रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली. नव्हे त्यानी स्वतः रक्तदान करत तरुणांना पुढे येण्याचे कृतीतुन अवाहन केले. 

कोरोनाच्या काळात रक्ताची कमतरता भासत असल्याचे आपण सगळ्यानी पाहिले त्याची जाणीव आमदार घाडगे पाटील यांनाही होती, त्यात निमित्त कारगिल विजय दिनाचे होते. ज्या शहीदांनी आपले रक्त सांडुन भारतभुमीला स्पर्श करु दिला नाही, त्यांच्या त्यागाचे बलिदानाची किंमत कशातच करता येणार नाही. पण त्यांना अभिवादन करताना आपल्याही रक्ताचा उपयोग हा कोणत्याही गरजुला व्हावा हा हेतु घेऊन त्यानी रक्तदान केले.