उस्मानाबादेत भाजपचे जोडे मारो आंदोलन

 

उस्मानाबाद - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील असंसदीय वर्तनाबद्दल भाजपच्या 12 आमदारांना निलंबन करण्यात आलं. त्या विरोधात उस्मानाबादेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव  पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून निषेधाच्या घोषणा दिल्या...

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पक्षाचे १२ आमदार निलंबीत केल्याच्या ‍निर्णयाच्या विरोधात ‍जिल्हाधिकारी कार्यालय येथे भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळयास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच महाविकास आघाडी सरकार व भास्कर जाधवांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे  दहण करत असतांना पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत भाजपा वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

 तसेच जिल्हा भाजपाच्या वतीने ‍जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‍जिल्हाधिकारी यांना सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या सहयांचे निवेदन देण्यात आल्या. याप्रसंगी आंदोलनात भाजपा बुध्दीजीवी प्रकोष्ठ संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.स.ॲड खंडेराव चौरे, जि.सरचिटणीस ॲड नितीन भोसले, भाजयुमो जि.अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चा जि.अध्यक्ष विजय शिंगाडे, एससी मोर्चा जि.अध्यक्ष प्रविण सिरसाठे, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, तसेच भाजपाचे लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या अर्चना अंबुरे, देवकन्या गाडे, पुजा देडे, सहप्रसिध्दीप्रमुख विनायक कुलकर्णी, लक्ष्मण माने, नगरसेवक प्रविण पाठक, दाजीप्पा पवार, सुजित साळुंके, ओम नाईकवाडी, सुनिल पंगडवाले, बालाजी चव्हाण, सुरज शेरकर, प्रसाद मुंडे, गिरीष पानसरे, गणेश एडके, मेसा जानराव, सार्थक पाटील, व जिल्हाभरातील भाजप व सर्व भाजपा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.