उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानास मोठा प्रतिसाद 

 

उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये शिवसेना व युवा सेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानास मोठा प्रतिसाद मिळत असुन गावागावात सेनेच्या कामाचे कौतुक होत असल्याचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

 युवासेनेच्या माध्यमातुन नव्या शाखा तयार करण्याची मोहीम हाती घेतली असुन अनेक गावामध्ये मोठ्या संख्येने युवक पक्षामध्ये प्रवेश करीत असल्याने ही मोहीम यशस्वी होत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.   शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार राज्यभरात ११ ते २४ जुलै दरम्यान शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत आहे.

 जिल्ह्यामध्येही या मोहिमेअंतर्गत शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांच्या वाढदिवसापर्यंत युवासेनेच्या ५१ शाखा स्थापन होणार आहेत. तुळजापुर तालुक्यातुन सूरुवात झालेल्या या मोहीमेनंतर, कळंब,धाराशिव तालुक्यातील अनेक गावामध्ये युवासेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.शाखाप्रमुख,शिवसैनिक,शेतकरी व युवासैनिक यांच्याशी मुक्तपणे संवाद साधण्यात आला.यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी,बुथ रचना,बुथप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख,शाखाप्रमुख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी ऐकुन घेत तेथील समस्याची दखल घेण्यात आली. 

शिवसेना पक्षाचा सगळ्यात महत्वाचा घटक हा शाखाप्रमुख आहे, त्यांच्या मेहनतीमुळेच पक्षाची शक्ती विस्तारत आहे. त्यांना बळ देण्यासाठी ही मोहीम अधिक फलदायी ठरत आहे, त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. त्यांच्यामध्ये संचारलेल्या या ऊर्जेमुळे पक्षाला निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीतही फायदा होणार आहे. नवयुवकांना राजकारणात युवासेनेच्या माध्यमातुन व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. 

या व्यासपीठाच्या माध्यमातुन अनेक युवक नेते वेगवेगळ्या पदावर काम करत असल्याने ते मुख्य प्रवाहात आल्याचे दिसुन येत आहे. त्याला आता युवकातुन मोठा प्रतिसाद मिळत आहे, नवीन युवक युवासेनेमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे चित्र पाहयला मिळाले.गावागावात या मोहिमेचे मोठ्या उत्साहात स्वागत होत असुन सामान्य जनतेसाठी सूरु केलेल्या योजनाची माहिती देखील देण्यात येत आहे.पक्षाच्या माध्यमातुन सूरु केलेल्या योजनाची माहिती देण्याची जबाबदारी आता शाखाप्रमुखावर आली आहे. त्यानीही मोठ्या उत्साहाने हा उपक्रम यशस्वी करण्याचा शब्द दिला आहे.

या शिवसंपर्क अभियानामध्ये युवासेनेचे राज्य विस्तारक नितीन लांडगे,विस्तारक अविनाश खापे,सरपंच तथा युवासेना जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे,उपजिल्हाप्रमुख सागर बाराते,तालुकाप्रमुख वैभव वीर,सोशल मीडिया राज्य समन्वयक प्रशांत जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.