श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा

 

उस्मानाबाद  - महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव सुरु असून, आज ( मंगळवार ) रोजी भवानी तलवार अलंकार पूजा बांधण्यात आली आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज यांना देवी प्रसन्न होवून धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देवून आशीर्वाद दिले, त्यामुळे भवानी तलवार अलंकार पूजा बांधण्यात येते.

  तत्पूर्वी रात्री दवीजीची आरती झाल्यानंतर देवीजींच्या मुख्य चादीच्या पादुका नंदी या वाहनामध्ये ठेवून मंदिरास पूर्ण  प्रदर्शना मारण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार, पुजारी बांधव आदींची उपस्थिती होती.

 उद्या (दि.13 रोजी) श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.