बाळासाहेब सुभेदार यांना नवरत्न पुरस्कार प्रदान 

 

धाराशिव   येथील सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांना  पंढरपूर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय नवरत्न  पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी पद्मश्री चंद्रकांत पांडव, माजी आमदार रामहरी रुपनवर, डॉ. कैलाश करांडे, सांगलीचे माजी महापौर नितीन सावगावे, कल्याणराव काळे, संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , औद्योगिक क्षेत्रात अतुलनीय आणि कौस्तुकास्पद काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार दिला जातो. यंदाच्या नवरत्न पुरस्कारसाठी धाराशिव येथील सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांची निवड करण्यात आली होती.  मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 


पंढरपूर येथील सिंहगड सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सभागृहात रविवार दि. ४  जून रोजी हा कार्यक्रम पार पडला.  यावेळी सोमनाथ पाटील, डॉ. संजय सोनावणे, किरण पडवळ, शालन कोळेकर, बापूसाहेब हुंबरे, शिरीष कुलकर्णी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.