एसपी राजतिलक रौशन यांना  सर्वोत्कृष्ट ‘अपराधसिध्दी’ प्रशस्तीपत्र प्रदान 

 

उस्मानाबाद  : पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांना  सर्वोत्कृष्ट ‘अपराधसिध्दी’ प्रशस्तीपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल रौशन यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. 

उस्मानाबाद तालुक्यात २०१५ मध्ये  वाघोली येथे एक अनोळखी माहिलेचे शव आढळले . यात ओळख पटवणे अतिशय अवघड असताना राजतिलक रौशन यांनी तिच्या अंगातील कुर्ताच्या लेबल टॅगवरूनऑनलाईन फ्लिपकार्ट कंपनीकडून, असे कुर्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांची यादी व मोबाईल नंबर घेऊन त्या सर्व मोबाईलचे लोकेशन तपासले असता, एका मोबाईलचे वाघोली लोकेशन आढळले. एवढ्या  तुटपुंज्या माहितीवरूनच मयत व आरोपीची ओळख पटवून तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असता तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 

या गुन्ह्याचा तपास कामाबद्दल पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी एसपी राजतिलक रौशन यांना सर्वोत्कृष्ट ‘अपराधसिध्दी’ प्रशस्तीपत्र  देऊन सन्मानित केले आहे . रौशन यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.