कोरोना प्रतिबंधात्मक,उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी  नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

 

उस्मानाबाद -  जिल्ह्यात उद्भवलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे .जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोविड रुग्णसंख्येत वाढत असल्याने त्याचा  प्रादुर्भावात वाढ होऊ न देता वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे राबविणे अतिशय आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी श्री दिवेगावकर यांनी  पुढीलप्रमाणे नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

      नोडल अधिकारी यांचे नाव व पदनाम,नेमून दिलेले कामकाज अशी-
जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी-महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न असणाऱ्या व नसणाऱ्या कोविड रुग्णालयांकडून कोविड रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या फीसवर नियंत्रण ठेवणे व वेळोवेळी तपासणी करणे.

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री.व्ही.पी.चिंचाळकर-उस्मानाबाद जिल्हयातील सर्व परमीट रुम,बार,दारुची दुकाने यांच्यावर नियंत्रण ठेवणे व कोविड नियमांचे पालन न केल्यास संबंधिताविरुध्द गुन्हे दाखल करणे.या ठिकाणी ठरवून दिल्यापेक्षा जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे.सहायक आयुक्त अन्न श्री.एस.बी.कोडगिरे-जिल्हयातील सर्व CCC, DCHC, DCH ला भेट देवून शासन नियमानुसार निश्चित केल्याप्रमाणे जेवण देण्यात येते किंवा कसे याबाबत तपासणी करणे. CCC, DCHC, DCH मधील रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्न पदार्थांचा दर्जा गुणवत्ता, भेसळ, स्वच्छता, साफसफाई या अनुषंगाने तपासणी करणे.जिल्हयातील दुकाने,हॉटेल यांना भेट देवून तपासणी करणे,या ठिकाणी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत किंवा कसे याची तपासणी करणे. 

जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ-उस्मानाबाद जिल्हयातील सर्व चाचण्यांची,कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बाबत CIF  नुसार सर्व HRC व LRC बाबतची माहिती वेळेवर पोर्टलवर अद्यावत करणे.सक्रीय रुग्ण (Active  Cases) ची माहिती पोर्टलवर नियमितपणे अद्यावत करणे.जिल्हयात सुरु असलेल्या कोविड लसकीकरणाबाबतची माहिती पोर्टलवर दैंनदिन स्वरुपात अद्यावत करणे.कोरोना (कोविड-19) च्या विविध बाबींचे दैनंदिन अहवाल जसे –Positive Case Management,Discharge,Death,New Cases, Active Cases,Contact Tracing, RTPCR,Antigen Test इ.अहवाल दररोज वेळच्या वेळी अचूकपणे सादर करणे.

उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन)-जिल्हयातील सर्व CCC, DCHC, DCH चे तपासणी पथक प्रमुख म्हणून कामकाज पाहणे.सर्व CCC, DCHC, DCH चा दर गुरुवारी करण्यात येणाऱ्या तपासणीचा अहवाल संकलित करणे व तपासणी करतेवेळी आढळून आलेल्या त्रुटी दूर करणे.कृषी विकास अधिकारी डॉ.चिमनशेट्टी आणि  सहायक आयुक्त औषध दिपक सिद- कृषी विकास अधिकारी जि.प. उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद जिल्हयासाठी औषधी समन्वयक म्हणून काम पहावे.कोविड रुग्णालय व जिल्हयातील औषधी विक्रेते यांचेमध्ये समन्वय ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.Remidsiver,Fabiflu व इतर कोविड संबंधित औषधींचा साठा व त्याचे वितरण यावर नियंत्रण ठेवणे. Remidsiver इंजेक्शनचा पुरवठा पुरेसा प्रमाणात होत असल्याबाबत खात्री करणे.औषध दुकानांना भेट देवून नियमानुसार योग्य किमतीला विक्री होत असल्याबाबत खात्री करणे.कोविड रुग्णांना देण्यात येणारे Fabiflu व इतर सर्व औषधांचा साठा मुबलक असल्याची खात्री करणे व या कार्यालयास याबाबत अवगत करणे.

जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चारुशिला देशमुख-जिल्हयात धान्य,रॉकेलचा साठा पुरेसा प्रमाणात राहील याबाबत दक्षता घेणे.शिवभोजन योजना योग्य प्रकारे राबविली जात आहे.किंवा कसे याबाबत सनियंत्रण ठेवणे.कोविड प्रतिबंधात्मक कालावधी मध्ये जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेणे. जिल्हाव मृद व जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी-सर्व DCCC व DCHC मधील कोविड रुग्णांच्याध संपर्कात राहून तेथील सुविधेबाबत माहिती घेणे, कुठे काही औषधी पुरवठा व जेवण इत्याादी बाबत तक्रार असतेल तर संबधित इन्सिडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी व इन्सिंडट कमांडर तथा तहसिलदार यांचेशी संपर्क साधून ती दूर करणे. आपल्याी अधिनस्त कर्मचारी यांचे आपल्याक स्तररावरुन आदेश निर्गमित करुन DCCC व DCHC मध्येा उपचार घेत असलेल्याय रुग्णांच्याध फोनव्दाूरे संपर्कात राहणे.

 या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय,कायदेशीर कारवाईस पात्र राहील.या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.