जमियत- ए- उलेमा हिंद संघटनेच्या मराठवाडा सचिवपदी मसूद शेख यांची नियुक्ती
उस्मानाबाद - मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते समाजसेवक मसूद शेख यांची जमियत- ए- उलेमा हिंद संघटनेच्या मराठवाडा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
जमीयत उलेमा महाराष्ट्राच्या गव्हर्निंग कौन्सिलची दारुल उलूम सोनोरी ( जिल्हा अकोला ) येथे बैठक पार पडली. या बैठकीत जमियत- ए- उलेमा हिंद संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मौलाना हाफिज मोहम्मद नदीम सिद्दीकी यांची पाचव्यांदा निवड करण्यात आली तर मसूद शेख यांची मराठवाडा सचिवपदी प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे.
मसुद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव असून त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय प्रवासाची सुरुवात उस्मानाबाद येथे करुन अवघ्या महाराष्ट्रात मुस्लिम समाजात नावलौकिक मिळवले आहे, सामाजिक सौहार्द व बांधिलकी जपणा-या मसुद शेख यांच्या कामाची दखल घेत जमियत उलेमा सारख्या देशाभरात समाजकार्य करणा-या संघटनेने त्यांच्यवर मराठवाडा भागात सचिवपदी नियुक्ती करुन निश्चितच समाजकार्यला बळ दिले असल्याची भावना नागरीकांतर्फे व्यक्त केली जात आहे.