मुलीची छेड करणाऱ्या तरुणास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा

उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाचा निकाल 
 

उस्मानाबाद - शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीची  छेड काढल्याप्रकरणी आरोपीस सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. हा निकाल विशेष सत्र न्यायाधीश एन.एच. मखरे मॅडम यांनी दिला. 

शहरातील एका महाविद्यालयात ११ वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीची सलमान चांद पठाण ( वय १९ ) हा तरुण २०१८ मध्ये वारंवार छेड काढत होता. घरातून महाविद्यालयात जाताना रस्त्यात आडवून तसेच घरामध्ये असताना प्रेमाची मागणी करून छेड काढत होता. 

याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये ३५४ आणि अनुसूचित प्रतिबंधित कायदा कलम गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी वरील निकाल देण्यात आला. फिर्यादी तर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी काम पहिले. 

सविस्तर प्रेस नोट पाहा