खासदार निधी खर्च का झाला नाही ? यांचं कारण ओमराजे यांनी असं दिलं ... 

 

उस्मानाबाद - खासदार विकास निधी खर्च करण्यात महाराष्ट्रातील दहा खासदार नापास झाले असून, त्यात उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील नंबर आहे. यांबाबत उस्मानाबाद लाइव्हशी बोलताना खासदार ओमराजे यांनी कारण स्पष्ट केले आहे. 

खासदार निधी हा वर्षाला पाच कोटी  रुपये मिळतो, कोरोनामुळे दोन वर्षे मिळाला नाही. यावर्षी फक्त अडीच कोटी मिळाला, पैकी खासदार ओमराजे यांनी ६७ लाख रुपये खर्च केला आहे. यावरून  भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

याबाबत खासदार ओमराजे यांच्याशी संपर्क साधला असता  ते म्हणाले की, दोन वर्षे खासदार निधी मिळाला नाही, यावर्षी फक्त अडीच कोटी मिळाला आहे. मिळालेला निधी कोविडसाठी राखीव ठेवला होता. आता कुठं इतर कामासाठी निधी खर्च करण्यास परवानगी मिळाली आहे. पण एका महिन्यात निधी खर्च कसा होणार ? म्हणून निधी शिल्लक राहिलेला आहे. यापुढे असे होणार नाही.