तुळजापुरात  वाहन प्रवेश कर घोटाळा उघडकीस 

तुळजापूर नगरपरिषदचे मिळकत व्यवस्थापक शिवरत्न आतकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल 
 

तुळजापूर  : तुळजापूर येथील- सिताराम विलास छत्रे यांनी तुळजापूर शहरात वाहनतळ लिलाव प्रक्रियेमध्ये करारनाम्यातील अटीव शर्तीचा भंग करुन दि. 01.02.2015 ते दि. 31.01.2018 रोजी दरम्यान तुळजापूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहन धारकाकडुन बेकायदेशीर शहर प्रवेश या शिर्षकाखाली तुळजापुर शहरातील सर्व ठिकाणी अंदाजे एक कोटी रुपये रकमेचा अपहार करुन जनतेची व तुळजापूर नगरपरिषदेची फसवणुक केली. 

या प्रकरणी . उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे चालू असलेल्या चौकशीत सिध्द झाल्याने व जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी आदेशीत केल्याने तुळजापूर नगरपरिषदचे मिळकत व्यवस्थापक- शिवरत्न आतकरे यांनी दि. 09.09.2022 रोजी दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 468, 465, 471 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मद्यपी चालकाविरुध्द गुन्हा दाखल 

कळंब  : पिंपरवाडा, ता. धारुर, जि. बीड येथील- राजाभाऊ गोरख तिडके यांनी दि. 09.09.2022 रोजी 21.48 वा. सु. कळंब येथील केज रस्त्यावर चुकीच्या दिशेने कंटेनर क्र. एन.एल. 01 एडी 8599 हा मद्यधुंद अवस्थेत व निष्काळजीपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 सह मो.वा.का. कलम- 184, 185, 122 चे उल्लंघन केले. यावरुन कळंब पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.