उस्मानाबादचे वादग्रस्त तहसीलदार गणेश माळी यांच्याविरुद्ध चौकशीची चक्रे फिरली 

राज्य शासनाकडून गंभीर दाखल, विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला 
 

उस्मानाबाद - उस्मानाबादचे वादग्रस्त तहसीलदार गणेश माळी यांच्याविरुद्धच्या  तक्रार अर्जाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. विभागीय आयुक्तांनी तक्रारीतील प्रत्येक मुद्यांबाबत यंस्पष्ट अभिप्रायसह जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागितला आहे. यामुळे माळी यांचे धाबे दणाणले आहेत. 


उस्मानाबादचे वादग्रस्त तहसीलदार गणेश माळी यांच्या भ्रष्ट कारभाराची आणि उद्धट  वर्तनाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी राज्याचे अप्पर मुख्य सचिव ( महसूल ) यांच्याकडे २९ / ९/ २०२२ रोजी एका निवेदनाद्वारे केली होती. 


या निवेदनाची राज्य शासनाने गंभीर  दखल घेऊन तहसीलदार गणेश माळी  यांच्या भ्रष्ट कारभाराची आणि उद्धट वर्तनाची चौकशी करून  आवश्यक त्या कागदपत्रासह चौकशी अहवाल तातडीने शासनास सादर करण्याचे निर्देश कार्यासन अधिकारी यादव  यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना दिले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यास पत्र देऊन, सुभेदार यांच्या तक्रारीतील प्रत्येक मुद्याची चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह व आवश्यक कागद्पत्रासह तातडीने अहवाल पाठवावा, असे निर्देश दिले आहेत. 


तहसीलदार गणेश माळी  यांच्या भ्रष्ट कारभाराची आणि उद्धट वर्तनाची सविस्तर तक्रार सुभेदार यांनी दिल्याने राज्याचे अप्पर मुख्य सचिव ( महसूल ) यांनी गंभीर दाखल घेतली आहे. त्यामुळे तहसीलदार गणेश माळी यांचे धाबे दणाणले आहेत. 

काय आहे तक्रार ?

allowfullscreen