मस्सा येथे राष्ट्रवादीच्या वतीने महसूल विरोधात रस्ता रोको आंदोलन
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी शिवारामध्ये करण्यात आलेल्या बेकायदेशीर उत्खननाच्या अनुषंगाने मस्सा खंडेश्वरी येथील 36 शेतकर्यांच्या सातबार्यावर 40 कोटींपेक्षा जास्त रकमेचा बोजा टाकला आहे. त्यामुळे कळंब महसूल प्रशासनाच्या विरोधात मस्सा खंडेश्वरी येथील पीडित कुटुंबातील शेतकर्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली मस्सा खंडेश्वरी येथील चौकात बुधवारी (दि.9)रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनामुळे वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आनखी तीव्र करण्याचा इशारा दुधगावकर यांनी दिला आहे.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी निजामशाही गेली असा पण म्हणत होतो खरा पण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका महसूल प्रशासनाच्या निमित्तानेती निजामशाही आजही सक्रीय असल्याचं आपल्याला दिसतं महसूल प्रशासनाने निर्दोष असलेल्या 36 शेतकर्यांच्या जमिनीवर ती तब्बल 40 कोटी रुपयांचा बोजा टाकल्यामुळे संबंधित कुटुंबातील शेतकरी त्यात संपूर्ण ताणतणावाखाली आहेत.अशा ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये सदरील कुटुंबातील सदस्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याचे संपूर्णतः जबाबदारी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनावर राहील असा कडक इशारा संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.
येत्या दहा दिवसात महसूल प्रशासनाने सदरील शेतकर्यांच्या सातबारावरील बोजा कमी नाही केला तर पुढील आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी करण्यात येईल, व त्यावेळी मात्र न्याय मिळविण्यासाठी शेतकरी आपल्या हातामध्ये काहीही घेऊन आंदोलन करतील. सदर आंदोलनामुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असेही संजय पाटील दुधगावकर म्हणाले.
यावेळी मस्सा खंडेश्वरीच्या सरपंच प्रा. राजश्री वरपे, माजी सरपंच विष्णु बांगर, विक्रमराजे वरपे, गणपत थोरात, अनंतराव वरपे, बजरंग ताटे, नेमीनाथ इंगोले, बी.डी. शिंदे, सतीश शिंदे, सुनिल वरपे, अक्षय माळी, बापुराव थोरात, छगन वरपे, बालाजी वरपे, मधुकर वरपे, नवनाथ शिंदे, पोपट माळी, जरुनाना वरपे, सत्वशिला तांदळे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.