उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे ९० व्या वर्षात पदार्पण

 

उस्मानाबाद - मराठवाड्यात अग्रगण्य असलेल्या उस्मानाबाद जनता बँकेने ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. खातेदार, ठेवीदार आणि सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळेच  बँकेने उंच भरारी घेतली आहे.

या बँकेची सभासद संख्या ७४ हजार २०५ असून, भागभांडवल ६९. २३ कोटी आहे. निधी ४०१ . ६७ कोटी असून ठेवी १८१४ .२९ कोटी आहेत. कर्जे ११३०. ५९ कोटी वितरित करण्यात आले आहे. गुंतवणूक १०२४. ६० कोटी आहे, 

३० सप्टेंबर १९३३ ला बँकेची स्थापना झाली असून, या बँकेने ९० वर्षी पदार्पण केले आहे. बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, उपाध्यक्ष वैजिनाथ शिंदे आणि संचालक मंडळाने बँक अधिक प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.