महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी आरक्षणाची हत्या !
उस्मानाबाद - महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणापासून महाराष्ट्रातील ओबीसी समाज वंचित राहिला असून ओबीसी आरक्षणाची हत्या महाविकास आघाडी सरकारने हत्या केली असल्याचा आरोप करत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आज (दि.19) जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले की, ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा सादर करा असे भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने सुरुवातीपासून शासनास सांगण्यात येत होते. परंतु महाविकास आघाडीचे नेते व मंत्री केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यात मग्न होते. वर्षभरानंतर मागासवर्ग आयोग गठीत केला तर त्यांना निधी उपलब्ध करुन दिला नाही. मध्यप्रदेश सरकारने मागास आयोग नेमून इम्पेरिकल डाटा व ट्रीपल टेस्ट पुर्ण करुन सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण टिकविण्यात मध्यप्रदेश सरकार यशस्वी झाले.
तशा प्रकारचा महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कुठलाही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणापासून महाराष्ट्रातील ओबीसी समाज वंचित राहिला. ओबीसी आरक्षणाची हत्या महाविकास आघाडी सरकाने केलेली आहे. त्यामुळे या सरकारला सतेवर राहण्याचा कसलाही अधिकार नाही. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत दिशाभूल केली त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.