कौडगाव एमआयडीसी मधून ५ मेगावॅट सौर उर्जा निर्मिती सुरू

 – आ. राणाजगजितसिंह पाटील
 

उस्मानाबाद - आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद शहरालगत कौडगाव येथे साकारलेला ‘महानिर्मितीचा’ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून ५ मे.वॅट ऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष . नितीन काळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हस्ते आज दि. २३/०३/२०२२ रोजी इन्व्हर्टर रूम ची पूजा करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता . पवन रायफळे यांच्या सत्कार देखील करण्यात आला.

आ. पाटील यांच्या मागणीनुसार तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार साहेब यांनी कौडगाव येथे ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली होती, परंतु अनेक वर्ष हा प्रकल्प रखडल्यानंतर सन २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने कामाला मान्यता मिळवुन, दि. १९ सेप्टेंबर २०१९ रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.

 मार्च २०२० अखेर हा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होते, मात्र  महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मागील दोन वर्षे या प्रकल्पाचे काम ठप्प होते. प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील  यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. गेल्या वर्षी दिनांक २०/११/२०२१ रोजी कौडगाव येथे परिसरातील ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन या कामाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यानंतर सरकारला सज्जड इशारा दिला होता. महाजनकोचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांच्यासह विधिमंडळामध्ये याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून कौडगाव येथून ५ मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली आहे. सदरील प्रकल्प ५० मेगावॅट क्षमतेचा असून पुढील तीन महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची ग्वाही महाजनकोचे कार्यकारी संचालक श्री. संजय खंदारे यांनी दिली आहे.

सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे उशिरा का होईना परंतु जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लागत आहेत, ही बाब काही अंशी समाधानकारक असली तरी टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा विषय अजूनही प्रलंबित आहे. कौडगाव येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पाची नितांत आवश्यकता असून यास देखील नक्की यश मिळेल असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तसेच उस्मानाबाद हा आकांशीत जिल्हा  असून उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांनी येथे यावे, बैठक घ्यावी, यासाठी आपण आग्रही असून राज्य सरकारने या बाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यास त्यास तात्काळ मंजुरी मिळवून घेऊ असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब व्यक्त केला आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, आंबेजवळगा सरपंच आनंद कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,  शहराध्यक्ष राहुल काकडे, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, कुलदीपसिंह भोसले, हिम्मत भोसले, मेसा जानराव, शेषेराव उंबरे, संदीप इंगळे, प्रवीण सिरसाठे, प्रीतम मुंडे, दाजीप्पा पवार, सुजित साळुंके, सागर दंडणाईक, आप्पासाहेब नाईकवाडी आदी उपस्थित होते.