ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत करावयाच्या जमिनीसाठीआक्षेप किंवा तक्रारी अर्जावर सुनावणी

 

उस्मानाबाद :  परांडा तालुक्यातील 20 आणि तुळजापूर तालुक्यातील 11 असे एकूण 31 गावातील अहमदनगर –सोलापूर अक्कलकोट- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत करावयाच्या जमिनीसाठी कलम ३ A अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. या अनुषंगाने ज्या हितसंबंधी व्यक्ती किंवा विधिज्ञ यांना आक्षेप अर्ज दाखल करतील त्यांनी दिलेल्या तारखेस आणि वेळी सुनावणीसाठी कार्यालयात हजर राहावे.असे आवाहन सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) राजकुमार माने यांनी केले आहे.

 राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर-सोलापूर-अक्कलकोट-महाराष्ट्र-कर्नाटक अंतर्गत जमीन संपादीत करण्यासाठी कलम ३.A अधिसूचना भारत सरकारचे राजपत्र का.आ. ३५९३ (अ) दि.1 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिध्द झाले आहे. ही अधिसूचना राजपत्र दै. लोकमत (मराठी) व दै. द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी) मध्ये दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेआहे. त्यामध्ये 21 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तींना भूसंपादन कार्यालयाकडे आक्षेप अर्ज सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

येथील परांडा तालुक्यामधील  १) चिंचपूर (खु), २) आरणगांव, ३) अनाळा, ४) चिंचपूर (बु), ५) घारगांव, ६) हिंगणगांव (बु), ७) जाखेपिंपरी, ८) जवळा (नि), ९) कांदलगांव, १०) कुंभेफळ, ११) मलकापूर, १२) पांढरेवाडी, १३) राजुरी, १४) रत्नापूर, १५) रोहकल, १६) साकत (बु), १७) सिरसाव, १८) टाकळी, १९) उंडेगांव व २०) वाडी राजुरी या २० गावांचा या अधिसूचनेत समावेश आहे. तसेच तुळजापूर तालुक्यामधील मौ. १) देवकुरुळी, २) धोत्री, ३) काटगाव, ४) काटी, ५) खडकी, ६) खुंटेवाडी, ७) पिंपळा (बु), ८) पिंपळा (खु), ९) सांगवीकाटी, १०) सावरगांव व ११) सुरतगांव या ११ गावांचा सदर अधिसूचनेत समावेश आहे.

अधिसूचना प्रसिध्दीचा दि.9 ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत संबंधित व्यक्ती अथवा त्यांच्या विधिज्ञामार्फत प्राप्त होणा-या आक्षेप किंवा तक्रारी अर्जावर पुढीलप्रमाणे सुनावणी घेण्यात येणार आहे.दि. 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांवर दि. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा, दि. 18 ते 24 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांवर दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा आणि दि 25 ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांवर दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वा. उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्रं. २ उस्मानाबाद यांच्या कार्यालयात भूसंपादन अधिकारी प्रशासकीय इमारत, पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी घेतली जाणार आहे.