उस्मानाबाद तालुक्यातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची आरोग्य सेवकाच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी
तू माझ्यावर प्रेम कर, तुला शेताची मालकीण बनवतो...
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य सेवकाच्या पत्नीला म्हणाला , तू माझ्यावर प्रेम कर, मी तुला शेताची मालकीण बनवतो. इतकेच काय तर त्याने अनेकवेळा शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी या आरोग्य सेवकाने ढोकी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली असून, तीन दिवस झाले तरी पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही.
उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशन लोमटे यांनी आरोग्य सेवक धोंडीराम गुरव यांच्याकडून नको ती खासगी कामे करून घेत होते. घराच्या कामाबरोबर हात -पाय दाबून घेणे, तेलाने मालिश करून घेणे आदी कामे तर नित्याची होती, पण त्याने या आरोग्य सेवकाच्या पत्नीला फोन करून ' तू माझ्या घरी राहायला ये, तू माझ्यावर प्रेम कर, तुला शेताची मालकीण बनवतो, म्हणून शरीरसुखाची मागणी केली .
याप्रकरणी आरोग्य सेवक धोंडीराम गुरव यांनी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये १२ मार्च रोजी रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोणतेही कारवाई केलेली नाही. या तक्रार अर्जानंतर डॉ. लोमटे यांच्या सांगण्यावरून एका कर्मचाऱ्याने आरोग्य सेवक गुरव यास दारू पिऊन धमकी दिली. तसेच अन्य काहीजण तक्रार मागे घे म्हणून दबाब टाकत आहेत,.
याच शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने एका आशा कार्यकर्तीस अश्लील मेसेज पाठवल्याचे समजते. त्याची तक्रारही दाखल होत आहे. स्त्रीलंपट डॉ. लोमटे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.