युवक-युवतींना शिक्षण, रोजगारासाठी संपूर्ण सहकार्य - आ. पाटील

 

उस्मानाबाद  - जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, सर्वसामान्य गोरगरिब कुटुंबातील युवक, युवतींना शिक्षण, उद्योग, व्यवसाय, रोजगारासाठी सदैव सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. उस्मानाबाद येथील श्री अकॅडमी येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी- विद्यार्थिनींशी आ. पाटील यांनी संवाद साधला.

उस्मानाबाद येथे संभाजीनगर परिसरातील श्री अकॅडमीच्या प्रधान कार्यालयास आ. पाटील यांनी दि‌.३० मे रोजी भेट देवून प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. यावेळी अकॅडमीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आ.पाटील म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, सिंचन, रस्ते, वीज अशा पायाभूत क्षेत्रामध्ये ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या माध्यमातून भरीव काम झालेले आहे. 

 अवर्षणग्रस्त जिल्ह्यात डॉ. पाटील यांनी भरीव काम केल्यानंतर सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत झाली. डॉ. पाटील यांनी शेतकरी, शेतमजूर,कामगार, कष्टकरी, गोरगरिब, सर्वसामान्यांच्या मुला-मुलींना शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसायासाठी सदैव सहकार्य, मदत करण्याचे काम केले. आम्ही देखील त्यांच्या विकास कामाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास सबका विश्वास ही विचारधारा घेवून जिल्ह्यातील युवक, युवतींना शिक्षण, उद्योग, व्यवसाय, रोजगार, देण्यासाठी सदैव सहकार्य केले आहे़ 

श्री अकॅडमीने उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्गाचे कार्य कौतुकास्पद आहे़ श्री अकॅडमीला आमचे संपूृर्ण सहकार्य राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील होतकरू, अभ्यासू विद्यार्थी, विद्यार्थीनींनी स्पर्धा परिक्षेच्या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेवून आपला विकास साधावा, असे आ. पाटील यांनी सांगितले. 

तत्पूर्वी अकॅडमीच्या वतीने संस्थापक प्रा़ शहाजी माळी, प्रा़ निथीलेश दिक्षीत, प्रा़ बाजीराव जाधवर, प्रा़ सारिका शिंदे, प्रशिक्षक अमर टेकाळे, प्रा़ शामल वाघमारे आदींनी सत्कार करून  स्वागत केले़ यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माने, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.