उस्मानाबादच्या शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासनाकडून  ९४ नव्हे कोटी ९.४ कोटी मिळाले...

खासदारांचे अज्ञान की दिशाभूल ?
 
आ.राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील शाकीयनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी केवळ रु. ९.४ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असताना स्थानिक आमदार व खासदार यांनी रुपये ९४ कोटीची तरतूद करण्यात आल्याची खोटी माहिती  देऊन जिल्हावासीयांची घोर फसवणूक केली आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी, खेदजनक व तेवढीच घृणास्पद आहे. ९.४ आणि ९४ यामधील फरक न कळण्याइतपात अज्ञान ? की जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल ? एवढया मोठया लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या लोक प्रतिनिधीसाठी हि बाब अत्यंत अशोभनीय आहे, अशी टीका भाजप आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. 

 

उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निदान २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तरी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या अर्थसंकल्पात केवळ रु. ९.४ कोटी रुपयांची तरतूद करून महाविकास आघाडी सरकारने उस्मानाबाद करांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आणि याहून मोठा कहर म्हणजे सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून जिल्हावासीयांची दिशाभूल केली जात आहे. 

वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असताना आता यांनी जाहीर केलेले रु ९४ कोटी याच अर्थसंकल्पात मंजूर करून घेण्याची जबाबदारी या लोकप्रतिनिधींची आहे, असेही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीम्हटले आहे.