स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनात दुपटीने वाढ

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या  पाठपुराव्यामुळे यश
 

उस्मानाबाद  - देशात सर्वत्र ७५ वा अम्रत महोत्सव साजरा होत असतानाच स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनात रूपये १०,००० वरून रूपये २०,००० अशी वाढ करण्याचा यथोचित निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 

उमरगा लोहारा तालुक्याचे  आमदार ज्ञानराज चौगुले , स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी समिती यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मा.मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या दिलासादायक निर्णयाचा फायदा हा भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्तिसंग्राम व  गोवा मुक्तिसंग्रामातील सुमारे ६,२२९ स्वातंत्र्य सैनिकांना यांचा लाभ होणार आहे.

स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची दखल घेवून यथोचित गौरव करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य शासनाने १९६५ पासून दरमहा मानधन देण्याची योजना सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे २ ऑक्टोबर २०१४ पासून दर महिन्याला रूपये १०,०००/- मानधन स्वरूपात देण्यात येत आहे. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अम्रत महोत्सव व स्वातंत्र्य सैनिक यांना मिळणारे  तुटपुंजे मानधन या प्रश्नांना वारंवार अधोरेखीत करून, राज्य सरकारला योग्य निर्णय घेण्यासाठी बाजू मांडून उचित व योग्य वेळी निर्णय घेण्यास भाग पाडले. सदर शासन निर्णयामुळे राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे मासिक मानधन  रूपये १०,००० वरून रूपये २०,०००/- दरमहा मिळेल. 

अम्रत महोत्सव वर्षात  योग्य व गौरवपूर्ण मानधन वाढीच्या निर्णयामुळे स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाल्य प्रसाद पाटील, दिनकर माने ,दादासाहेब बिराजदार, श्रीमान पटवारी व श्रीमान नहाने यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,. आमदार ज्ञानराज चौगुले  व राज्य सरकारचे आभार व्यक्त करून समाधानाची भावना व्यक्त केलेली आहे.