तारीख पे तारीख ... निराश झालेल्या उस्मानाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या 

 

उस्मानाबाद - न्यायालयात 'तारीख पे तारीख 'असून कालही न्यायालयात  एसटी विलीकरणाचा कोणताही निर्णय न झाल्याने निराश झालेल्या उस्मानाबादच्या एका एस टी कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनंतर प्रेत ताब्यात घेण्यास कुटुंबानी नकार  दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  प्रशासनाच्या  लेखी आश्वासनंतर प्रेत ताब्यात घेण्यात आलं असलं तरी यामुळे वातावरण अधिक चिघळले आहे. 

<a href=https://youtube.com/embed/CVzE0O0ijbo?autoplay=1><img src=https://img.youtube.com/vi/CVzE0O0ijbo/hqdefault.jpg alt=""><span><div class="youtube_play"></div></span></a>" style="border: 0px; overflow: hidden"" style="border: 0px; overflow: hidden;" width="640">

तुळजापूर आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या हनुमंत चंद्रकांत आकोसकर यांचं उस्मानाबादच्या गणेशनगर भागात घर आहे. मूळचे कोळेवाडी येथील रहिवासी असलेल्या आकोसकर यांनी शुक्रवारी रात्री आपल्या उस्मानाबादच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, शनिवारी सकाळी त्यांचा  मृतदेह उस्मानाबाद आगारात आणण्यात आले असता काही काळ वातावरण तणावाचे झाले होते. 

एसटी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रेत ताब्यात घेण्यात आले, परंतु यामुळे वातावरण अधिक चिघळले आहे. राज्यात १०० हुन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या कलेची असून राज्य सरकार आणखी किती एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे ? असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. मृत हनुमंत चंद्रकांत आकोसकर यांना पत्नी, दोन मुले , आई वडील आहेत. 

उस्मानाबादच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन एसटी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.