उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना हद्दपार पण निर्बंध कायम 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी
 

उस्मानाबाद -   जिल्ह्यातील कोरोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात यापुढेही निर्बंध असतील. याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज जारी केले आहे.

आवश्यक निकषांची पूर्तता होत नसल्याने उस्मानाबाद जिल्ह्याचा “यादी अ” मध्ये समावेश झालेला नाही. कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या डोसचे प्रमाण      90 ट्क्के पेक्षा अधिक असणे.कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचे प्रमाण 70 ट्क्के पेक्षा अधिक असणे.कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांचा दर (पॉझिटीव्हीटी रेट) 10 ट्क्के पेक्षा कमी असणे.रुग्णांसाठी ऑक्सीजन पुरवठा असलेल्या व आयसीयु बेड्सचा वापर 40 ट्क्के पेक्षा कमी असणे.या निकषांची पूर्तता होत नसल्याने जिल्ह्याचा “यादी अ” मध्ये समावेश झालेला नाही.

कोविड-19 साथरोग संदर्भाने महाराष्ट्र शासनाचे आदेश, जिल्हा प्रशासनाचे आदेशांमधील अटी, शर्ती, दंडाबाबत निर्देंशाचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती, आस्थापना आणि शासकीय-निमशासकीय विभागांना बंधनकारक असेल. कोविड-19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण लसीकरणाची व्याख्या आणि कोविड अनुरुप वर्तन (CAB) याबाबत यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. या आदेशामध्ये उल्लेख नसलेल्या बाबींसंदर्भात भारत सरकारने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :-

जनतेशी मोठ्या प्रमाणात संपर्कात येणाऱ्या सर्व आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील.घरपोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील.सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील.शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडास्पर्धा, धार्मिक स्थळे इ. ठिकाणी भेट देणाऱ्या सर्व व्यक्तींचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील.ज्या सार्वजनिक सेवेमध्ये नागरिकांचा इतरांशी परस्पर संवाद होण्याची शक्यता असते. अशा परस्पर संवादामुळे कोविड-19 चा प्रसार होण्याची शक्यता असल्यास आणि त्याठिकाणी कोविड अनुरुप वर्तनाची (CAB) प्रभावी अंमलबजावणी शक्य नसल्यास अशा कोणत्याही सार्वजनिक सेवेच्या ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्याबाबतचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असतील.सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क असणाऱ्या कोणत्याही शासकीय अथवा खाजगी कार्यालयात किंवा आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील.औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील.

सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, उत्सवाचे प्रसंग इ. मेळावे कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून कार्यक्रमाच्या निश्चित केलेल्या जागेच्या 50 ट्क्के क्षमतेने अथवा 200 लोकांच्या मर्यादेत यापैकी जे कमी असेल तेवढ्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

विवाह कार्यक्रम/ अंत्यविधी :

कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून कार्यक्रमाच्या निश्चित केलेल्या जागेच्या 50 टक्के क्षमतेने अथवा 200 लोकांच्या मर्यादेत यापैकी जे कमी असेल तेवढ्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून निश्चित केलेल्या जागेच्या        50 टक्के क्षमतेने अथवा 200 लोकांच्या मर्यादेत यापैकी जे कमी असेल तेवढ्या मर्यादेत मुभा असेल.

शाळा,महाविद्यालये,कोचिंग क्लासेस :

महाराष्ट्र शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाच्या कोणत्याही आदेशाच्या अधिन राहून सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीने वर्ग पुन्हा चालू करण्यास मुभा राहील. सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासनास ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही संयुक्त पद्धतीने शिक्षण देण्याबाबत प्रोत्साहित करण्यात यावे.सर्व शाळा पूर्व वर्ग तसेच अंगणवाडी प्रत्यक्षपणे पुन्हा सुरु करण्यास परवानगी राहील. वरिल सर्व संस्था, आस्थापनांमध्ये कोविड अनुरुप वर्तनाचे (CAB) काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील.

शॉपींग मॉल्स, बाजार संकुले नाट्यगृह,चित्रपटगृहे रेस्टॉरेन्ट , उपहारगृह, बार क्रीडा संकुले, जलतरण तलाव, व्यायामशाळा स्पा, सलून, केशकर्तनालये, ब्युटीपार्लर, वेलनेस सेंटर्स धार्मिक स्थळे,प्रार्थनास्थळे मनोरंजनाची स्थळे जसे की उद्याने, प्राणी संग्रहालये, संग्रहालये, बाग-बगीचे,पार्कस्, किल्ले, स्थानिक पर्यटन स्थळे इत्यादी इ. कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास मुभा राहील.

राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवास :

संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासाकरिता कोणतेही निर्बंध लागू असणार नाहीत.संपूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना आंतरराज्य प्रवासाकरिता प्रवासाचे 72 तासादरम्याचे आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल सोबत असणे गरजेचे आहे.अशा प्रकारच्या प्रवासाकरिता कोणत्याही प्रकारच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही.सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने चालू राहतील. औद्योगिक व वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेने चालू राहतील.इतर सर्व बाबी कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास मुभा राहील.सर्व ठिकाणी कोविड अनुरुप वर्तनाचे (CAB) काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील.

कोविड अनुरुप वर्तनासंबंधीच्या तरतुदी सदर आदेशासह संलग्नित परिशिष्ट-1 प्रमाणे असेल.सर्व पात्र लाभार्थींचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याबाबत वेगाने कार्यवाही करण्यात यावी. दारोदार जाऊन लसीकरण मोहिमांचे आयोजन करण्यात यावे. सर्व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि अध्यापनेतर कर्मचारी वर्गाचे संपूर्ण लसीकरण झाले असल्याची खात्री करण्यात यावी. संपूर्ण लसीकरणाबाबत भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.कोणत्याही प्रकारचे गैरसमज, घबराट टाळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कोविड-19 च्या प्रादुर्भावाची सद्यस्थिती, कोविड चाचण्या इ. बाबतची माहिती जनतेकरिता व्यापक स्वरुपात उपलब्ध करुन द्यावी. कोविड अनुरुप वर्तनाची (CAB) प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी तसेच यासाठी समूह योगदानास प्रोत्साहित करण्यात यावे.

हे आदेश उस्‍मानाबाद जिल्हा सीमा क्षेत्रात दिनांक 04 मार्च 2022 च्या        मध्यरात्री 00.00 ते पुढील आदेशापर्यंत लागू असेल.या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 तसेच भारतीय दंड संहिता   (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय आणि कायदेशीर कारवाईस पात्र राहील.